भाजप युवा मोर्चा प्रवक्त्या यांनी देशवासीयांची माफी मागावी - शर्मिला येवले

 

पारनेर प्रतिनिधी

रुची पाठक यांनी एका कार्यक्रमात अजब वक्तव्य केला आहे त्या वक्तव्य त्या म्हणाल्या ब्रिटिशांनी भारताला 99 वर्षाच्या भाडेकराराने करार आणि स्वातंत्र्य दिले आहे.




    रुची पाठक यांनी हे कुठे वाचलं हे जनतेला सांगावे आणि जर तुमच्या म्हणण्यानुसार ब्रिटिशांनी भारताला 99  वर्षाच्या भाडेकराराने स्वातंत्र्य दिला आहे तर 99 वर्ष पूर्ण झाल्यानंतर भारताच्या स्वातंत्र्याचा काय होणार याचे स्पष्टीकरण द्यावे मुळातच रुची पाठक एका पक्षाच्या प्रवक्ते आहेत त्यांनी वक्तव्य करताना जबाबदार बोलावं त्यांच्या बोलण्यावरून हे  विधान किती बालिशपणाच आहे हे सिद्ध होतं. त्यामुळे देश स्वतंत्र कसा झाला आणि ते स्वातंत्र्य होण्यासाठी ज्यांनी लढा दिला त्यांचा रुची पाठक तरुणीने घोर अपमान केला आहे त्यामुळे तिने देशवासीयांची माफी मागावी आणि पुराव्यानिशी सिद्ध करावे.

शर्मिला येवले (युवासेना सहसचिव महाराष्ट्र राज्य)

Post a Comment

0 Comments