आधी कोरोना चाचणी मगच लस
टाकळी ढोकेश्वर आरोग्य केंद्रात कोरोना लसिकरणाचे दुसरे डोस
चंद्रकांत कदम पारनेर
कोरोना चाचणीचे अहवाल नकारात्मक आल्यावरच कोरोना लसीकरण करण्याचा निर्णय झाला असल्याने त्यांची ठोस अंमलबजावणी पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील प्राथमिक अरोग्यकेंद्रावर होत आहे.
सध्या १८ वर्षावरील व ४५ वर्षांवरील नागरिकांना पारनेर तालुक्यात ऑफलाईन पद्धतीने कोव्हीशिल्ड व कॉवक्सिन चे दुसरे डोस दिले जात आहेत. गुरुवारी टाकळी ढोकेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रावर कॉवक्सिन चे १८ वर्षांवरील व ४५ वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. यावेळी प्रथम नागरिकांना अँटीजन (RAT) व आर्टीपिसीआर (RTPCR) करणे बंधनकारक करण्यात आले होते. आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांची मोफत चाचणी करण्यात आली. अहवाल नकारात्मक आलेल्या नागरिकांचे ऑफलाईन पद्धतीने लसीकरण करण्यात आले.

0 Comments