कोरोना चाचणीच्या उशिरा येणाऱ्या अहवालामुळे रुग्णसंख्या वाढण्याची भीती

 


ग्रामसमृद्धी फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास वाजे करणार आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार


पारनेर प्रतिनिधी


एकीकडे सरकार कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत असताना दुसरीकडे कोरोना चाचणीचे अहवाल यायला ८ दिवस लागत असतील तर बाधित रुग्णापासून रुग्णसंख्या वाढण्याची भीती असल्याची  वडनेर बु. ग्रामसमृद्धी फौंडेशनचे अध्यक्ष विकास वाजे यांनी व्यक्त केली आहे.  कोरोना चाचणीचे अहवाल लवकरात लवकर मिळावेत याबाबत ते आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्याकडे तक्रार करणार आहेत.


प्रशासनाच्या वतीने कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. लक्षणे जाणवलेल्या रुग्णांची तातडीने तपासणी करून त्यांना विलगिकरणात ठेऊन उपचार करणे गरजेचे आहे. लक्षणे जाणवू लागलेल्या रुग्णांची कोरोना चाचणी (आरटीपीसीआर) अहवाल यायला उशीर होत असून कधी कधी जवळपास ८ दिवस लागत आहेत. संशयित रुग्ण दिसायला लागल्यावर किमान २-३ दिवसांनी चाचणी रुग्ण चाचणी करतात. त्यानंतर अहवाल यायला ८ दिवस लागत असतील तर  रुग्णाला लक्षणे जाणवायला लागल्यापासून १०-१२ दिवसानंतर त्यांचे अहवाल येतात.तोपर्यंत त्या रुग्णाने अनेक जणांना बाधित केलेले असते. व त्यामुळे "ब्रेक द चैन" ही संकल्पना पूर्णत्वास जात नाही व रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याची भीती पारनेर तालुक्यातील वडनेर बु. ग्रामसमृद्धी फौंडेशनचे अध्यक्ष विकास वाजे यांनी व्यक्त केली आहे. याबाबत ते आरोग्यमंत्रांकडे तक्रार करणार असून यात सुधारणा करण्याची मागणी करणार असल्याचेही वाजे यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments