पारनेर प्रतिनिधी
देवीभोयरे ग्रामपंचायतीत सत्तांतर झाल्यानंतर ग्रामपंचायतीने स्मशानभुमी नुतनीकरण, दशक्रीया विधीसाठी नवीन परीसराचे निर्माण, पार्किंग व्यवस्था व उद्यान सुशोभीकरणाचा निर्णय घेतला. त्या अनुशंगाने लोकनेते आमदार निलेशजी लंके साहेब यांचे यांचे निधीतून स्मशानभूमीत पेव्हींग ब्लाॅक चे काम पुर्ण झाले आहे तर स्नानगृह व स्वछता गृहासाठी तिन लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. या परीसर विकासासाठी सरपंच विठ्ठलराव सरडे, चेअरमन तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अशोकराव मुळे, उपसरपंच संपतराव वाळुंज व ग्रामपंचायत सदस्या रोहिणी संभाजी मुळे यांनी प्रत्येकी एक हायमॅक्स भेट देऊन त्याची ऊभारणी केलेली आहे. स्मशानभुमीच बदलत असलेल रुप पाहुन ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थांचे कौतुकास पात्र ठरत असतानाच काही अज्ञात इसमांनी हायमॅक्स पोलवरील तिन दिव्यांची चोरी केलेली आहे.आम्ही गरज असेल तिथे,वाडी वस्तीवर मागेल त्याला विजेचे दिवे ग्रामपंचायत मार्फत देण्याचा प्रयत्न करत असतांना अशा प्रकारचे कृत्य निंदनीय आहे व सदर घटनेची तक्रार दाखल करणार असल्याची प्रतिक्रिया सरपंच विठ्ठलराव सरडे यांनी दिली.तर ग्रामस्थांमधुन या प्रकृतीचा जाहीर निषेध व्यक्त होत आहे.

0 Comments