पारनेर प्रतिनिधी
कोरोना कमी करण्यासाठी सरकार मार्फत लसीकरण मोहीम व गावोगावी रॅपिड टेस्ट सुरू आहेत. WHO व तज्ञांच्या मते तिसरी लाट येण्याची शक्यता आहे पहिल्या लाटेचा फटका शहरी भागाला बसला होता परंतु दुसर्या लाटेत शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागाला जास्त प्रमाणात बसला. त्यामध्ये लहान मुले सुद्धा कोरोना बाधीत झाली आहेत. या पाश्र्वभूमीवर आरोग्य केंद्रात लहान मुलांसाठी स्वतंत्र वार्ड व बेड उपलब्ध करण्यात यावे. तसेच नियंञणासाठी बाल रोग तज्ञांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी राळेगण थेरपाळ गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच पंकजदादा कारखिले यांनी केली.
तसेच कोरोना काळात सेवा केलेल्या सर्वच प्रशासकीय अधिकारी व वैद्यकीय सेवा देणाऱ्या शासकीय व खासगी डॉक्टरांचे कौतुक केले.

0 Comments