यशस्वी फाउंडेशन संगमनेर यांच्यातर्फे पारनेर कोव्हीड सेंटरला १५०० लिटर फवारणी औषध भेट


डॉ नंदकुमार गोडगे यांच्याकडून रुग्णांना मार्गदर्शन



पारनेर प्रतिनिधी

डॉ श्रीकांत पठारे संचलित पारनेर येथील कोव्हीड सेंटरला मदतीचा ओघ सुरू असून संगमनेर येथील यशस्वी फाउंडेशन तर्फे फवारणी साठी लागणारे सोडियम हायपोक्लोराईड १५०० लिटर औषध आदित्य घाटगे व  भाऊसाहेब वैद्य यांच्यातर्फे मोफत भेट देण्यात आले. 


     कोव्हीड सेंटरच्या माध्यमातून रूग्णांची मोफत सेवा करणारे डॉक्टर समाजात फार कमी असतात. त्यापैकी डॉ श्रीकांत पठारे हे एक आहेत. त्यांच्या सामाजिक कामाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला झाल्याने त्यांच्या कामावर प्रेरित होऊन आमच्या संस्थेने या कोव्हीड सेंटरला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्जंतुकीकरण व फवारणीसाठी लागणारे सोडियम हायपोक्लोराईड १५०० लिटर औषध मोफत भेट देण्यात आले. तसेच संगमनेर मधील डॉ नंदकुमार गोडगे यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले. कोव्हीड काळात घ्यावयाचा आहार व व्यायाम व काळजी याविषयी मार्गदर्शन केले. स्टाफ ला देखील मार्गदर्शन केले. यावेळी डॉ पद्मजा पठारे, प्रमोद पठारे, प्रशांत निंबाळकर, अक्षय फापाळे आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments