लग्नसोहळ्यासाठी नातेवाईक व मित्र परिवाराची ऑनलाइन हजेरी
टाकळी ढोकेश्वर :
कोरोना विषाणूचे संकट , आजारपणाचे वातावरण , सगळी भयग्रस्त परिस्थिती असे असुनही वधुवरांनी विवाह सोहळयात स्त्रीजन्माच्या स्वागताचा आठवा फेरा घेतला . विवाह सोहळयात महत्वपुर्ण कार्याची जबाबदारी नंदू शिंदे व सुधाकर ठाकर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली . सदर समारंभात फक्त ५० व्यक्ती उपस्थित होते . सर्वांसाठी मास्क व या सॅनेटायझर ची व्यवस्था केली होती तसेच सोशल डिस्टंसिंग पाळुन शासनाची रितसर परवानगी घेऊन काटेकोर निती नियमात हा सोहळा संपन्न झाला.
शिंदे परिवारातील श्री मयुर आणि ठाकर परिवारातील कु.प्रिती यांचा शुभविवाह शेटफळ पाटी ता. इंदापूर येथे संपन्न झाला . या विवाह सोहळयात सात फेऱ्या नंतर आठवा फेरा स्त्रीजन्माच्या स्वागताचा घेण्यात आला . शासनाने विवाह सोहळ्यासाठी पन्नास व्यक्तींची परवानगी दिलेली आहे, त्यामुळे जास्त वऱ्हाडी मंडळी उपस्थित राहू शकले नाही जे उपस्थित राहू शकले नाही त्यांनी डिजिटल स्वरूपामध्ये सोशल मीडियाचा वापर करून या लग्नाला हजेरी लावली, यामध्ये व्हाट्सअप कॉन्फरन्स कॉल, गुगल मीट, फेसबूक, या सोशल मीडियाचा वापर करून नातेवाईक, मित्रमंडळींनी लग्नाला हजेरी लावली, तसेच फोन वरून शुभेच्छा दिल्या व त्यांचे कौतुक केले .
मुलींची घटती संख्या हा मोठा चिंतेचा विषय आहे . हा मुलभुत प्रश्न आहे . तो सोडिवण्यासाठी विवाह सोहळयातच आठवा फेरा घेऊन स्त्रीजन्माच्या स्वागताची भुमिका पक्की केली पाहिजे असे या नविन विवाह बंधनात अडकलेल्या जोडप्याने सांगितले . सार्वजनिक संकटकाळातही , कोरोना महामारीच्या वातावरणातही आपण आपले कर्तव्य न विसरता मौलिक योगदान दिलेत त्याबद्दल सर्वच कुटुंबांचे मन : पूर्वक अभिनंदन . आजची मुलगी ही उदयाची माता आहे आणि मातेच्या पोटीच उदयाची पिढी जन्म घेणार आहे . जर मुलगीच जन्माला आली नाही तर संपुर्ण पिढीचेच नुकसान होणार आहे . एकंदरीत मानवजातीलाच धोका निर्माण होणार आहे याची जाणीव ठेऊन महामारीच्या काळातही कर्तव्याचे भान ठेवले असे नव वधू प्रिती शिंदे यांनी सांगितले.
सर्व मित्र परिवाराने वधू वरांचे जीवन सुख - समाधान - आनंद - यश यांनी परिपूर्ण व्हावे व कौटुंबिक, सामाजिक, जीवनही समृध्द असावे अशी परमेश्वरचरणी प्रार्थना केली , नंदू शिंदे, अभिषेक शिंदे, निखिल शिंदे, सुधाकर ठाकर, अनिकेत शिंदे, प्रशांत पवार, रामदास शिंदे, अनिल लोंढे, रमेश साळुंके, राहुल पवार या सर्वांनी मित्रमंडळी नातेवाईक यांसाठी ऑनलाइन सोशल मीडिया उपलब्ध करून दिले, त्यामुळे अनेक जणांनी या लग्नसोहळ्याचा आनंद घेतला यामध्ये राहुल वाळुंज, पत्रकार किरण थोरात, महेश ठाणगे, अनिल पवार, अविनाश रोकडे, संदीप वाघ या सारख्या अनेकांनी या सोहळ्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून हजेरी लावली.


0 Comments