डॉ मन्सूर मौलवी यांना पुणे विद्यापीठाची पी.एच. डी

पारनेर
बेल्हे ता. जुन्नर येथील रहिवासी व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर ता.जुन्नर जि. पुणे येथे सध्या कार्यरत असलेले सहाय्यक प्राध्यापक डॉ. मन्सूर हिसामुद्दिन मौलवी यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिाची पो.एच.डी.पदी प्राप्त झाली आहे.

       डॉ मौलवी यांनी 'नॅनो क्रस्टलाईन डोपड मॅग्नेशियम ऑक्साईड, झिंक ऑक्साईड अँड मँगनीज डाय ऑक्साईड कॅटालिस्त फॉर विटिग रिएक्शन' या विषयावरील प्रबंध पुणे विद्यापिठास सादर केला होता. त्यास विद्यापिठाणे पी.एच. डी पदवी प्रधान केली. या कामी त्यांना डॉ. के.जी. कानडे व डॉ. बी.बी. काळे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. डॉ. मौलवी यांनी यापूर्वी बाळासाहेब जाधव महाविद्यालय, आळे तालुका जुन्नर येथून बी.एस्सी. व पुणे विद्यापीठातून एम.एस्सी, (ऑर्गनिक केमिष्ट्री) पदवी प्राप्त केली आहे. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असताना  त्यांनी संपूर्ण शिक्षण 'कमवा व शिका' या योजनेतून स्वबळावर पूर्ण कले. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments