साकूर फाटा ते साकूर रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण- मनोज कोळेकर

ग्रामीण भागातील युवकांनी घेतला पुढाकार: रस्त्याचे काम करा अन्यथा आंदोलन

साकुर 

राज्य शासन कितीही ‘खड्डेमुक्त महाराष्ट्र’ होणार असे सांगत असले तरी नगर  जिल्ह्यात मात्र तशी परिस्थिती सध्या तरी दिसून येत नाही. जिल्ह्यातील रस्त्यांची वाट लागली आहे. खड्ड्यांत रस्ते की रस्त्यात खड्डा हेच लक्षात येत नाही. याचा परिणाम अपघात होण्यावर होत आहे. सार्वजनिक बांधकाम खाते वाट पाहा, अशी भूमिका घेताना दिसून येत आहे. जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीही झाली आहे. याचा परिणाम संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांवरून दिसून येत आहे रस्त्यांची पूर्णपणे चाळणी झाल्याने वाहन चालकांना रस्त्यावरील खड्डे वाचवुन रस्त्याचे मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे. ग्रामीण भागातुन तालुक्याला जोडणारे रस्त्याची संपूर्ण बिकट परिस्थिती झाली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.नागरिकांना रस्त्यावरुन चालतांना खड्डयांचा अंदाज येत नसल्याने वाहनांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. तालुक्यातील साकुर फाटा ते साकुर रस्ता संपूर्ण खड्डयात गेला आहे. प्रमुख रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक किरकोळ अपघात सुध्दा घडले आहेत . रस्त्याची डागडुजी होत नसल्याने नागरिकांना नाहकच त्रास सोसावा लागत आहे. 
   प्रशासन रस्ता दुरुस्तीसाठी पुढाकार घेत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसे सैनिक मनोज दादा कोळेकर  यांनी संगमनेर तालुक्यामधील साकुर परिसरामध्ये  रस्त्यांच्या खड्ड्यांमध्ये माती टाकून रस्त्याचे खड्डे बुजवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. एक चांगल्या प्रकारचे काम करून परिसरातील लोकांसमोर आदर्श ठेवला आहे, आजू बाजू च्या  गावातील लोकांनी  त्याच्या कडून काहीतरी  शिकणयासारखं आहे.
   कोणी येईल मग काम होईल याची वाट न बघता ते स्वतः चांगल्या  कामाची सुरुवात ते आपल्या पासून करतात  जनतेच्या सेवेसाठी त्यांनी साकूर फाटा ते साकूर रस्त्यावर पडलेले खड्डे  भरले, कोणतीही जिवीत हानी होऊ नये म्हणून प्रयत्न केले रस्त्याचे काम थांबले आहे रस्ता खराब झाला आहे त्याच्या मुळे ग्रामीण भागातील  जनतेला खूप त्रास होत आहे म्हणून मनोज दादा यांनी  साकूर फाटा ते साकूर ला  येणारा रस्ता खूप खराब झाला आहे याची पाहणी केली व  चिंचेवाडी या ठिकाणी कोळेकर वस्ती वर चा रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे  काम हाती घेतले आहे.  मुलांना, महिलांना व  ग्रामीण भागातील लोकांना याचा  खूप त्रास होत आहे मोठ्या प्रमाणात जीवीत हाणी होऊ शकते, असे ग्रामीण भागातील लोकांचे म्हणणे आहे. लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे   अन्यथा आंदोलनाला सामोरे जावे लागेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसे सैनिक मनोज दादा कोळेकर यांनी  प्रशासनाला इशारा दिला आहे.

Post a Comment

0 Comments