रोख ठोक न्यूज :-
पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथे एका युवकाला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे घशाचे स्त्राव तपासणी नमुने घेतले असून तपासणी नंतर त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
पिंपरी जलसेन येथे सासऱ्याच्या घरी ३ मे पासून राहत असणाऱ्या जावयाला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्याला उपचारासाठी आज सकाळी जिल्हा रुग्णालयांमध्ये पाठवण्यात आले होते. रुग्णालयात जात असताना रस्त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू पश्चात घशाचे स्त्राव तपासणी नमुने घेण्यात आले असून तपासणी अहवालानंतरच मृत्यू कशामुळे झाला ते स्पष्ट होणार आहे. सध्या पारनेर तालुक्यामध्ये या तरुणाच्या मृत्यू बद्दल उलट सुलट चर्चा होत असून हा रुग्ण सारी या आजाराचा आहे की कोरोना बाधित आहे की दुसरा कुठला आजार होता हे तपासणी अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
मृतदेह हा प्रशासनाच्या ताब्यात असून तपासणी अहवाल आल्यानंतर त्या तरुणाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. पुणे - मुंबई, ठाणे व इतरत्र ठिकाणाहून आलेल्या नागरिकांनी विलागीकरण कक्षात राहणे अनिवार्य आहे. कारोणा सुरक्षा समितीने बाहेरून आलेल्या नागरिकांच्या नोंदी ठेवून याबाबतची सर्व माहिती प्रशासनास देणे गरजेचे असल्याचे पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी आदेश दिले आहेत.

0 Comments