रोख ठोक न्यूज :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील कॅन्टोंमेन्ट झोन वगळता जिल्ह्यात सार्वजनिक सोयीसुविधांच्या अनुषंगाने पेट्रोल पंपावरील डिझेल विक्रीची वेळ वाढविण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.
अहमदनगर जिल्ह्याच्या महसुल स्थळ सीमेच्या हद्दीमध्ये डिझेल विक्रीची वेळ आता सकाळी 5 ते सायं 5 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. तसेच पेट्रोल विक्री पूर्वीप्रमाणेच दररोज सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंतच राहील.
कोणतीही व्यक्ती संस्था, संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कमल 188 नुसार दंडनिय कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी या आदेशात स्पष्ट केले आहे.

0 Comments