निलेश लंकेच्या फेसबुकच्या त्या पोष्टमुळे परप्रांतीय कुटुंबाचा आत्महत्येचा विचार जाऊन त्यांना मिळाला मायेचा आधार
रोख ठोक न्यूज पारनेर
आठ महिन्यांची मुलगी, दोन वर्षांचा मुलगा यांच्या दुधाची तसेच कुटूंबाच्या जेवणाची व्यवस्था करू न शकल्यामुळे सुपे येथे वास्तव्यास असलेल्या मध्यप्रदेशातील राजवर्धन या मजुराच्या मनात आत्महत्या करून जिवनयात्रा संपवून टाकण्याचे विचार घोळत होते. त्याच वेळी आ. नीलेश लंके यांची फेसबुकवरील पोष्ट राजवर्धनच्या वाचनात आली आणि आत्महत्येचे गारूड दुर होउन आठ दिेवसाच्या कालखंडानंतर राजवर्धनच्या मुलांच्या दुधाची तसेच कुटूंबाच्या भोजनाची व्यवस्था झाली. हाती पैसा नसल्याने निराश झालेल्या राजवर्धनच्या कुटूंबासाठी आ. नीलेश लंके हे या निमीत्ताने एका अर्थाने देवदूतच ठरल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.गेल्या महिन्यात अचानक लॉकडाउनची घोषणा झाली आणि सुपे पसिरात पत्नी, आठ महिन्यांची मुलगी व दोन वर्षांच्या मुलासह राहणा-या राजवर्धन या बांधकाम मजुराच्या कुटूंबाची उपासमार सुरू झाली. सुरूवातीस पाण्याबरोबर बिस्किटे खाउन त्यांनी दिवस काढले. पुढे मुलांना दुध मिळत नसल्याने ते रडून आकांत तांडव करीत. पती पत्नीच्या पोटात अन्नाचा कण नसल्याने हे दिवस काढायचे तरी कसे असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा होता. कोणताही आधार नसल्याचे खचलेल्या राजवर्धनने आत्महत्या करून जिवयात्रा संपविण्याचा विचार केला. तशातच ज्यांच्या जेवणाची सोय नसेल यांनी संपर्क साधरण्याचे अवाहन करणारी पोष्ट फेसबुकवर राजवर्धनच्या वाचण्यात आली. त्याने तात्काळ फोन केला, मात्र फोन वारंवार व्यस्त येत असल्याने त्याने निराश होउन फोन करण्याचे प्रयत्न सोडून दिले. काही वेळानंतर त्याच नंबरवरून राजवर्धनला फोन आला. परंतू तो घेईपर्यंत तो कट झाला. त्यानंतर त्याने या पोष्टमध्ये दिलेल्या आ. लंके यांच्या संपर्क कार्यालयाच्या नंबरवर फोन केला. तेथे तात्काळ प्रतिसाद मिळून त्याच दिवसापासून या कुटूंबाच्या भोजणाची, मुलांच्या दुधाची व्यवस्था करण्यात आली.
रोजगार बंद झाल्यामुळे या कुटूंबास मध्यप्रदेशातील इंदुर येथे जायचे होते. योगायोगाने इंदुर येथे जाणारे वाहन उपलब्ध झाल्याने आ. लंके यांनी राजवर्धनच्या कुटूंबाची इंदुर येथे जाण्याची व्यवस्था केली.अनवाणी असलेल्या पत्नी तसेच मुलासाठी चप्पल घेउन दिली. एकवेळी आत्महत्येचा विचार घोळवत असताना आ. लंके यांनी या कुटूंबाच्या सर्व समस्या दुर केल्याने सुपे परिसरात तो चर्चेचा विषय ठरला.
देव नाही, देवदूत पाहिला !
आम्ही आमच्या गावी पोहचल्यानंतर आ. लंके यांनी रात्री पावणेबाराच्या सुमारास फोन करून आम्ही सुखरूप पोहचलो किंवा नाही याची आस्थेने चौकशी केली. आम्ही त्यांचे मतदारही नाहीत. तरीही केवळ माणूसकीच्या भावनेतून त्यांनी आमच्यासाठी केलेली मदत लाखमोलाची आहे. आम्ही देव पाहिला नाही, लंके यांच्या रूपाने देवदूत पाहिला असल्याची प्रतिक्रीया राजवर्धन याने दिली.![]() |
| सुपे, ता. पारनेर येथे अनवाणी असलेल्या राजवर्धनची पत्नी तसेच मुलास आ. नीलेश लंके यांनी चप्पल घेउन देत त्यांची आस्थेने चौकशी केली. |

0 Comments