दारूची खबर दिल्याने महिलेला मारहान ; चौघांविरोधात गुन्हा दाखल, एकाला अटक

रोख ठोक न्यूज

     
पारनेर तालुक्यातील देविभोयरे येथील कौलावस्तीवर गावठी दारूच्या विक्रीची खबर  पोलिसांना दिल्याच्या रागातुन एका महिलेला मारहान करत विनयभंग  केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

    याबाबतची माहीती अशी की,येथील कौला वस्तीवर रिकाम्या बिसलरी बाटलीत गावठी दारू भरून विक्री चालु होती.,त्यामुळे येथे अनेकांची वर्दळ होऊन त्रास होत असल्याची माहीती येथील महीलेने फोनवर लोकजागृती सामाजिक संस्थेला दिली. संस्थेने याबाबत खात्री करून पारनेर पोलिसांना हि माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तिथे छापा मारला होता. पोलिसांना आपल्या धंद्याची
माहिती फिर्यादी महिलेच्या पतीने दिली असावी असा संशय घेवून त्यांना  याबाबत जाब विचारून आरोपीने जबर मारहान केली. याबाबत  फिर्याद देण्यासाठी पती - पत्नी
पारनेरला निघाले असता त्यांना पुन्हा घरासमोर रस्त्यात अडवून दारू विक्रेत्या महिलेच्या मुलाने फिर्यादी महिलेला शिवीगाळ करतविन केल्याची तक्रार फिर्यादिने पारनेर पोलिसांत दिली आहे.
      याबाबतची फिर्याद मारहान झालेल्या महिलेने पारनेर पोलिस ठाण्यात नोंदवली असुन या प्रकरणी विनयभंग करणाऱ्या एकास पोलिसांनी तातडीने अटक केली  आहे. पुढील तपास पारनेर पोलिसांकडून चालु आहे.

     लोकजागृती सामाजिक संस्थेनेया विषयी  फिर्यादी महीलेची भेट घेतली असुन तीच्या  पाठिमागे खंबीरपणे उभी राहुन न्याय तिला मिळवून देवू ,अशी माहिती संस्थेकडून देण्यात आली. अवैध दारू विक्रीची माहिती न घाबरता पोलिसांना किंवा संस्थेला कळवावी असे आवाहनही संस्थेने केले आहे. 


Post a Comment

0 Comments