चव्हाणवाडी तालुका शिरूर येथील रहिवासी ज्ञानदेव दत्तात्रय चव्हाण प्रथमिक शिक्षक कासारी शिरूर यांचे सुपुत्र चैतन्य ज्ञानदेव चव्हाण यांचे वाघोली पुणे येथे सोमवार दि. 8 जानेवारी रोजी अपघाती दुःखद निधन झाले होते .चैतन्य हा उच्चशिक्षित तरुण नुकताच पुणे येथे कामाला लागला होता.ऑफिस ला जाताना अज्ञात वाहनाने दिलेली धडक त्याच्या जीवावर बेतली, वडील ज्ञानदेव चव्हाण व आई वैशाली चव्हाण व सर्व परिवारावर मोठा दुःखाचा प्रसंग ओढवला ,गेल्या दहा दिवसापासून चव्हाणवाडी येथे हजारो नातेवाईकांनी व मित्रपरिवाराने भेट देऊन चव्हाण परिवाराचे सांत्वन केले . चैतन्य याच्या अकाली निधनाने चव्हाण परिवारावाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले असून अवघ्या 22 वर्षाचे वय असताना त्याने खूप मोठी स्वप्न पहिली होती. या दुुखद प्रसंगात त्याचे मामा डी वाय एस पी अनिल कटके हे खंबीरपणे परिवाराच्या पाठीशी उभे राहिले चैतन्य हा त्यांचा भाचा असून प्रगतशील शेतकरी नामदेव चव्हाण यांचे पुतणे होत.
दशक्रिया विधी बुधवार दिनांक 17 जानेवारी रोजी सकाळी 8:00 वाजता चव्हाण वाडी येथे होणार आहे.

0 Comments